Sunday, April 26, 2020

सृष्टी लॉकडाऊनमधली



घुसमटलेली पृथ्वी आता, मोकळा श्वास घेतेय 
शुद्ध ताज्या हवेमध्ये, नवकांतीने सजतेय      

धूर केर -कचऱ्याने, माखली होती सृष्टी 
स्वच्छ जणू होतेय आता,  निसर्गाचीच दृष्टी   

आकाशही निरभ्र, स्वच्छ दिसू लागलंय 
रंगांच्या छटांतुनी, गालातच हासतय    

नदी नाले स्वच्छ सारे, वाहत आहेत मुक्तपणे 
कर पसरले स्वागता स्तव,  आनंदे सागराने      

वसंतातली पालवीही, आनंदाने डोकावतेय 
घरात बसल्या मानवाला, दुरूनच खुणावतेय    

कोकणचा मेवा आता,  आलाय आमच्या दारात 
दुरूनच बघत बसलोय, आम्ही असे घरात    

चराचर सृष्टी झाली, निर्भय अन स्वछंदी 
किलबिलत बागडती, पशु -पाखरे 
आनंदी     

खूश होती सारे हे, आद्यजीव सृष्टीचे 
मानू या मनोमन, आभार लॉकडाउनचे  

----==============----
                      *मुग्धा कुळये*
                           रत्नागिरी.

No comments:

Post a Comment